"रंगावर्तुळाला आपल्या उपस्थितीने उत्साही करणारे डॉक्टर" -

 

आज 05 नोव्हेंबर  - 

 

मराठी रंगभूमी दिन  - 

 

आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय 

नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेकडून यावर्षीचा रंगभूमी 

दिन रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेश 

पायर्‍यांवर प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होत आहे. 

या कार्यक्रमात गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्याचे नाट्य परिषद रत्नागिरी 

शाखेकडून ठरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे यावर्षीचा 

ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून  सत्कारार्थी होण्याचा मान केवळ 

ज्यांची उपस्थिती हीच एक आनंदाची आणि उत्साहाची 

पर्वणी ठरते असं सदा आनंदी नाव म्हणजे 

डॉ.भगवान नारकर.



'रंगावर्तुळाला आपल्या उपस्थितीने उत्साही करणारे डॉक्टर' - 

 

केवळ ज्यांची उपस्थिती हीच एक आनंदाची आणि उत्साहाची पर्वणी ठरते असं सदा आनंदी नाव म्हणजे डॉ.भगवान नारकर. डॉक्टर ज्या कार्यक्रमात उपस्थित असतात त्याची ऊर्जा ही आपोआप द्विगुणित होते. आधी नाटक मग सिनेमा आणि 

आता वेबसिरीज या तिन्ही माध्यमातून लीलया वावरणारे नाव महान डॉ. नारकर होत. डॉक्टरांचे गाव संगमेश्वर तालुक्यातील कडवई आहे. डॉक्टरांनी केलेल्या सिनेमांचा उल्लेख करायचा झाला तर सन 2011 सालचा 'सुंदर माझे घर', 'हर हर महादेव', 'चिरंजीव', 'हाक', 'कुणी घर देतं का घर', 'काकस्पर्श ', 'साथ सोबत', 'आनंदी' आदी चित्रपटात अत्यंत सुंदर भूमिका 

साकारल्या आहेत.

चित्रपटातील केवळ भूमिकाच नव्हे तर मान्यवर अभिनेत्यांच्या प्रकट मुलाखती घेण्याचे दुर्मिळ काम डॉ. नारकर यांनी केले 

आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची 

घेतलेली मुलाखत त्याच सोबत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या सोबतची दिलखुलास गप्पायुक्त मुलाखत, अभिनेते अविनाश नारकर, दिग्दर्शक प्रमोद पवार यांच्या मुलाखती या प्रामुख्याने वाखाणण्याजोग्या अशाच आहेत. नव्या पिढीच्या माध्यम समजल्या जाणाऱ्या वेबसिरीजच्या फॉरमॅटमध्ये 

देखील डॉ. नारकर यांनी लक्षवेधी काम केले आहे. त्यामध्ये ज्याचा उल्लेख केल्या शिवाय पुढेच जाता येत नाही असे काम म्हणजे 'तेजोनिधी', 'कोकण कन्या' आणि 'सपान' या वेबसिरीज आणि त्यातील डॉक्टरांच्या भूमिका. सध्या अर्धम 

ही हिंदी वेब सिरीज करत आहेत.  

डॉक्टरांनी अभिनय केलेल्या शॉर्टफिल्म या पुरस्काराची 

आणि सन्मानाची मानकरी ठरणाऱ्याच असतात अशीच 

धारणा होऊ लागली आहे. 

'स्नेहबंध', 'वशीकरण', 'तहान', या साऱ्या लघुपटांमधील डॉक्टरांच्या भूमिका या दर्जात्मक आणि निव्वळ लक्षवेधी 

अशाच म्हणाव्या लागतील. 

नमन एक लोक कला या वरील राष्ट्रपती पुरस्कार विजेते 

सिने दिग्दर्शक मोरे सर यांच्या कलर ऑफ हॅपिनेस या शॉर्ट फिल्ममध्ये सहभाग आणि सहकार्य.

वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात डॉक्टरांनी अभिनित 

केलेल्या लघुपटांना पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले 

आहेत. जसे की कोल्हापूरचा राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव. 

डॉक्टरांच्या अगदी एकांकिकानीदेखील राज्यस्तरीय 

स्पर्धांमधील विजेते पदाचे विक्रमच घडविले आहेत. 

डॉक्टरांची 'पदम पत्र स्थितम तोयम' ही एकांकिका राज्यभरातील  मानाच्या सर्व स्पर्धा जिंकणारी ठरली आहे. 

डॉ. नारकर यांची अनेक विषयांवर व्याख्याने देखील झाली  आहेत. त्यामध्ये आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर आरोग्य 

विषयक व्याख्याने, त्याचबरोबर विभिन्न शैक्षणिक 

संस्थांसाठी तसेच सामाजिक संस्थांकरिता डॉक्टरांनी 

व्याख्यानांचे असंख्य कार्यक्रम केले आहेत. मुंबई 

विद्यापीठाच्या कॉलेजेसकरिता देखील प्रशिक्षणे आणि शिबिरांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. 

अविनाश फणसे सरांनी दिग्दर्शित केलेल्या कथा कुणाची 

व्यथा कुणा या नाटकात अत्यंत महत्वाची भूमिका 

बजावली आहे. 

पुरुषोत्तम करंडकावरही त्यांनी आपले नाव कोरले आहे.  

एवढेच नाही तर डॉ. नारकर हे महाराष्ट्र कलोपासक पुणे 

संस्थेचे देखील सदस्य आहेत. डॉक्टरांवर सामान्यातले 

असामान्य ही छोटी डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शित झाली आहे.

 

अशा या अफाट कर्तृत्ववान व्यक्तीचे विशेष अभिनंदन आणि 

शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी 

माहिती स्त्रोत  - अमेय धोपटकर , रत्नागिरी 

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास 

हरकत नाही.